‘अंतर्नाद’ बंद झालं, तर त्यात आनंद वाटण्यासारखं काय आहे?
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी चाललेला एक सकस प्रयत्न थांबवावा लागत आहे, हे पाहून जर त्या प्रयत्नाशी निगडित असलेल्यांना खेद वाटत आहे, तर त्या विषादाला निव्वळ ‘पेठांतले, शहरात राहणारे, अभिजनांचे सुस्कारे’ असं म्हणून खिल्ली उडवण्यासारखं काय आहे? (आणि हा प्रयत्न तळमळीनं काम करत झटणाऱ्या काळेंसारख्या साहित्यप्रेमीला ‘मनोरा संपादक’ असं हेटाळून पवार यांना नेमकं काय साधायचं आहे?).......